तिकीट विकणारी व्यक्ती आदर्श काम करू शकत नाही

माजी उपसभापती बंड्या मांजरेकर यांचा अतुल रावराणे यांना टोला

*💫वैभववाडी दि.१३-:* पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी अगोदर विधानसभा निवडणूक लढवावी. मागील निवडणुकीत पक्षाने दिलेली तिकीट त्यांनी दुसऱ्याला विकली. तिकीट विकणारी व्यक्ती आदर्श काम करू शकत नाही. अशा शब्दात श्री रावराणे यांची वैभववाडी माजी उपसभापती बंड्या मांजरेकर यांनी पत्रकातून खिल्ली उडवली आहे. वैभववाडी येथे भैरीभवानी प्रतिष्ठानच्या वतीने बळीराजा आत्मसन्मान योजनेचा शुभारंभ पार पाडला. या कार्यक्रमात शेतकऱ्यांना काजू रोपांचे वाटप करण्यात आले. शिवसेना नेते अरुण दुधवडकर यांनी आपल्या भाषणात योजना राबविणा-या अतुल रावराणे यांचे कौतुक केले. ते म्हणाले, अतुल रावराणे हेच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करतील. यावरती माजी उपसभापती बंड्या मांजरेकर यांनी टीकास्त्र सोडले आहे. श्री मांजरेकर म्हणाले, आदर्शवत काम करण्यासाठी सेनेने रावराणे यांना विधानसभेचे तिकीट पुन्हा द्यावी. मात्र श्री. रावराणे यांना माझी नम्र विनंती की मिळालेली तिकीट यापुढे दुसऱ्याला विकू नये. बळीराजा सन्मान योजना शुभारंभाला जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांची प्रमुख उपस्थिती हवी होती. परंतु त्यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. सतीश सावंत हे रावराणे यांचे कार्यक्रम टाळत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे सेनेत उभी फूट आहे हे निश्चित आहे. असे पत्रकात मांजरेकर यांनी म्हटले आहे.

You cannot copy content of this page