*💫कुडाळ दि.१२-:* कुडाळ तालुक्यातील युवकांनी माजी तालुकध्यक्ष बाबल गावडे, उप तालुकध्यक्ष दीपक गावडे व विभाग अध्यक्ष सुंदर गावडे यांच्या माध्यमातून मनसेचे सरचिटणीस परशुराम उर्फ जीजी उपरकर यांच्या उपस्थितीत मनसे पक्षात प्रवेश केला. कुडाळ तालुक्यातील पिंगुळी धूरीटेंबनगर, भुपकरवाङी, नेरुर व सरंबळ येथील वैभव धुरी, रोशन सावंत, शुभम धुरी, गजानन राऊळ, तुषार धुरी,अविराज धुरी, सुरेश चव्हाण, रियाझ तहसीलदार, दिनेश चव्हाण, नारायण गावडे, अक्षय वरक आदी युवकांनी मनसेचा झेंडा हाती घेतला आहे. यावेळी धुरीटेम्बनगर वॉर्ड शाखाध्यक्ष पदी वैभव धुरी यांची निवड करण्यात आली. यावेळी जिल्हा सचिव बाळा पावसकर, मनसे विद्यार्थी सेना अध्यक्ष कुणाल किनळेकर, कुडाळ तालुकध्यक्ष प्रसाद गावडे, सचिव राजेश टंगसाळी, विभाग अध्यक्ष सचिन ठाकूर, कुडाळ शहर उपाध्यक्ष वैभव परब आदी पदाधिकारी उपस्थित होते.
कुडाळ तालुक्यातील युवकांचा सरचिटणीस परशुराम उपरकर यांच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश
