Headlines

बहुजन कर्मचारी शाखेच्यावतीने आरक्षण बचाव आंदोलन

सावंतवाडी संयोजक सगुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली केला घंटानाद

*💫सावंतवाडी दि.१२-:* राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ सिंधुदुर्ग जिल्हा सावंतवाडी शाखेच्या वतीने आज सोमवार १२ जुलै रोजी प्रतिनिधित्व ( आरक्षण) बचावो – लोकतंत्र बचावो या आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत तालुकास्तरीय धरणे प्रदर्शन व घंटानाद आंदोलन तहसीलदार कार्यालयासमोर करण्यात आले आहे. हे आंदोलन राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन संघ सिंधुदुर्ग जिल्हा सावंतवाडीचे संयोजक सगुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. कोरोना आणि जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या जमावबंदीच्या पार्श्वभूमीवर मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्यामार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे. यावेळी सगुण जाधव, अनिकेत जाधव, महादेव जाधव, रुपेश जाधव, दीक्षा जमदाडे, सुमन कदम, प्रतिक जाधव, भालचंद्र जाधव, कांता जाधव, लाडू जाधव आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page