खारेपाटण अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सतर्कतेच्या सूचना
*💫कणकवली दि.१२-:* मुसळधार पावसामुळे पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली असून खारेपाटणमधील सुख नदीने धोक्याची पाणीपातळी गाठल्याच्या पार्श्वभूमीवर कणकवली प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी सोमवारी दुपारी खारेपाटणमध्ये भेट देत आढावा घेतला. तसेच सरपंच रमाकांत राऊत व ग्रामस्थांशी चर्चा देखील केली. पावसाचा जोर दुपारच्या सत्रात काही प्रमाणात कमी झाला असला तरी सतर्कतेच्या सूचना यंत्रणेला देण्यात आल्या. आवश्यकता असल्यास मदत कार्य लागले तरीदेखील यंत्रणा सज्ज ठेवावी अशा सूचना प्रांताधिकारी सौ. राजमाने यांनी दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत कणकवली पोलिस निरीक्षक अजमुद्दिन मुल्ला, निवासी नायब तहसीलदार सुजाता पाटील, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, मंडळ अधिकारी मंगेश यादव, संतोष नागावकर,तलाठी सिंगनाथ, सरपंच रमाकांत राऊत यांच्यासह अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. यावेळी प्रांताधिकार्यांनी खारेपाटण सुख नदी या परिसराची पाहणी केली.
