मिठबांव येथील बीएसएनएल टॉवर नॉटरिचेबल

नेटवर्क समस्येबाबत खास. विनायक राऊतयांचे परशुराम लोके यांनी वेधले लक्ष

*💫मालवण दि.१२-:* मिठबांव येथे दोन बीएसएनएल टॉवर आहेत. मात्र काही महिने नेटवर्क सुविधा वारंवार खंडित होत असल्याने ग्रामस्थांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे मिठबांव ग्रामपंचायत सदस्य परशुराम (तात्या) लोके यांनी खास. विनायक राऊत यांची भेट घेऊन मिठबावमधील नेटवर्क समस्येबाबत निवेदनाद्वारे लक्ष वेधत ही समस्या तात्काळ सोडविण्याची मागणी केली. मिठबाव गावातील नेटवर्कच्या अभावी ऑनलाईन धडे घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान, रेशनिंगवर निर्माण होणाऱ्या समस्या, बँकेत निर्माण होणाऱ्या समस्या या निवेदनातून खासदार राऊत यांच्या निदर्शनास आणून दिल्या. मिठबांव,कातवण, तांबळडेग हिंदळे मोर्वे, बागमळा आदी भागात बीएसएनएल नेटवर्क समस्या भेडसावत असून ही समस्या त्वरित दूर करावी अशी मागणी उपसरपंच परशुराम लोके यांनी खासदारांकडे केली आहे. नेटवर्क समस्या दूर करण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे खासदार विनायक राऊत यांनी यावेळी सांगितल्याची माहिती लोके यांनी दिली आहे. यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य प्रसाद (छोटू) ढोके, माजी सरपंच जयाजी जोगल, निलेश ढोके, गणेश जेठे, सागर जोगल, संकेत लोके आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page