कणकवली भाजपा माजी महिला अध्यक्षा स्वाती राणे कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित

*💫कणकवली दि.१२-:* कोविड संकट काळामध्ये आपल्या जिवाची पर्वा न करता जिल्ह्यातील जनतेच्या रक्षणासाठी तैनात असलेल्या कोविड योद्ध्याना कोल्हापूर कोविड हेल्पलाईन,महाराष्ट्र राज्य संस्थेच्यावतीने कोरोना योद्धा सन्मानपत्र कोल्हापूर दक्षिणचे आम. ऋतुराज पाटील यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.सदर कार्यक्रमात भाजप माजी महिला कणकवली तालुकाध्यक्षा तसेच जानवली माजी उपसरपंच सौ. स्वाती राणे यांचा कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोल्हापूर दक्षिणचे युवा आम. ऋतुराज पाटील हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून गटनेता काँग्रेस महानगरपालिका कोल्हापूर शारंगधर देशमुख हे उपस्थित होते. सौ. स्वाती राणे गेले दीड वर्ष कोरोना काळामध्ये कोल्हापूर तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोव्हिड पेशन्ट कोल्हापूर तसेच सिंधुदुर्गमध्ये व्हेंटिलटर बेड, ऑक्सीजन बेड, प्लाझ्मा ब्लड, तसेच इतर सुविधा जिजाऊ फाऊंडेशन कोल्हापुरचे सचिन तोडकर आणि या सर्व महाराष्ट्र राज्य कोरोना हेल्पलाईनचे संदिप पाटील तसेच वीरेषा आपटे, सौ.स्वाती कदम यांच्या मदतीने उपलब्ध करून देत आहेत. याची दखल घेत त्यांना कोरोना योद्धा म्हणून कोल्हापुर येथील लोकमान्य सभाग्रूहात सन्मानचिन्ह देत सन्मानित करण्यात आले. सर्व स्तरातून सौ. स्वाती राणे यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. यावेळी बोलताना सौ. राणे म्हणाल्या, सर्वानी आपल्या आरोग्याची काळजी घ्या. कधीही आपणांस कोणती कोरोनाच्या या काळात गरज वाटली तर आमच्याशी संपर्क करावा. संदीप पाटील, डॉ. विरेश आपटे, देविका पाटील, अष्टविनायक चव्हाण,स्वाती कदम, राहुल जयकर,साईदत्त सबनीस,सौरभ कपाडी, सागर ओतारी, आशिष कुलकर्णी, अमोल पाटील,सारिका पाटील, सौरभ मोलादी, सचिन लोंढे पाटील, रविराज घोडके, सोमनाथ भटनागर, संताजी पाटील, विशाल ढोबळे, ऋषिकेश जाधव,करण कारंडे, तेजश्री सावंत, स्वाती राणे, प्रसाद शिंदे , प्रवीण पाटील या सत्कारमुर्तीचे सत्कार आम. ऋतुराज पाटील यांच्या हस्ते करणेत आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.सिद्धी मिरजकर यांनी केले तर आभार व्यक्त डॉ. वीरेश आपटे यांनी केले.

You cannot copy content of this page