दोडामार्ग कॉंग्रेस बूथ कमिटी पदाधिकारी निवडी

जिल्हाध्यक्ष बाळा गावडेंच्या उपस्थितीत बैठक संपन्न

*💫दोडामार्ग दि.११-:* दोडामार्ग तालुका काँग्रेसची आढावा बैठक जिल्हा काँग्रेस अध्यक्ष श्री. चंद्रकांत ऊर्फ बाळा गावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज १० जुलै रोजी पार पडली. यावेळी दोडामार्ग तालुका अध्यक्ष श्री. वासुदेव नाईक यांनी एकूण ५५ बूथ कमिटी पैकी २८ बूथ कमिटी केल्या असून लवकरच बाकीच्या बूथ कमिटी पूर्ण करण्याचे ठोस आश्वासन दिले आहे. त्याबद्दल जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. त्याचप्रमाणे दोडामार्ग नगर पंचायतीच्या लवकरच होऊ घातलेल्या निवडणुकीबद्दल सुद्धा आढावा घेण्यात आला. त्यावेळी पूर्ण ताकतीनिशी १७ उमेदवार तयार असल्याचे तालुका अध्यक्ष यांनी सांगितले आहे. प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांचा स्वबळावर लढण्याच्या निर्णयाचे उत्स्फूर्तपणे दोडामार्ग कार्यकर्त्यांनी स्वागत केले आहे. यावेळी तालुका उपाध्यक्ष व प्रवक्ते इर्शाद शेख यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. या आढावा बैठकीला जिल्हा उपाध्यक्ष व प्रवक्ते इर्शाद शेख, जिल्हा चिटणीस सुभाष दळवी, सावंतवाडी तालुका उपाध्यक्ष समीर वंजारी, तालुका सदस्य शिवदास मणेरीकर, शहर सदस्य श्री सुधीर चांदेलकर व राजेंद्र गोवेकर, बुथ अध्यक्ष ब्रह्मानंद नाईक उपस्थित होते. त्यानंतर जिल्हा अध्यक्ष यांनी समस्त कार्यकर्त्यांसमवेत माजी पंचायत समिती सदस्य व काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते स्वर्गीय विनायक पांगम यांचे काही दिवसांपूर्वी देहावसान झाले होते. तसेच माजी तालुकाध्यक्ष संतोषकुमार दळवी यांच्या वडिलांचे देहावसान झाले होते. या दोन्ही कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांतवन केले आहे.

You cannot copy content of this page