पं.स. सदस्य निधी प्रविण मुणगेकर यांच्यातर्फे वित्त आयोगातुन बसविल्या सॅनिटायझर मशिन

*💫मालवण दि.११-:* लहान बालकांमधील कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचे गांभीर्य लक्षात घेऊन मालवण पंचायत समितीच्या आचरा विभागातील शिवसेना पं.स. सदस्य निधी प्रविण मुणगेकर यांच्यातर्फे १५ वा वित्त आयोग (तालुकास्तर) निधीतून जि.प. शाळा तोंडवळी वरची, शाळा तोंडवळी खालची, वायंगणी नंबर १, ठाणेश्वर शाळा, आचरा हीर्लेवाडी शाळा, आचरा पिरावाडी शाळा, आचरा बागजामडूल शाळा, आचरा उर्दुशाळा, आचरा शाळा नंबर १ मध्ये सॅनिटायझर मशिन बसविण्यात आली. यावेळी बोलताना निधी मुणगेकर म्हणाल्या, कोरोना महामारी विरोधातील लढ्यात विरोधक अशाप्रकारची सामाजिक कामे न करता राजकारण करण्यात व्यस्त आहेत, आम्ही मात्र आमच्या कामातून त्यांना उत्तर देत राहणार आणि तळागाळाच्या लोकांपर्यंत पोहचणार असेही त्या म्हणाल्या. यावेळी तोंडवली उपसरपंच वायंगणकर, ग्रामसेवक सुतार, वायंगणी सरपंच रेडकर मॅडम, आचरा उपसरपंच वायंगणकर, केंद्रप्रमुख गुरव मॅडम, शाळा मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आणि सदस्य आणि ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page