दांडी येथे राष्ट्रीय मत्स्यदिन साजरा

यावेळी विविध योजनांची देण्यात आली माहिती

मालवण (प्रतिनिधी) मत्स्य विभागाच्या वतीने मालवण दांडी आवार येथील मत्स्य प्रशिक्षण केंद्रात राष्ट्रीय मत्स्य संवर्धक दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना, मत्स्य विभागाच्या विविध योजना तसेच कांदळवन विभागाच्या उपजीविका योजना याबाबतची माहिती मत्स्य आणि कांदळवन विभागाकडून देण्यात आली. विभागाकडून देण्यात आली. यावेळी प्रभारी सहाय्यक आयुक्त रवींद्र मालवणकर, सिंधुदुर्ग जिल्हा श्रमजीवी रापण संघाचे सचिव दिलीप घारे, मालवण मच्छीमार सोसायटीचे अध्यक्ष विकी चोपडेकर, रामेश्वर मच्छीमार सोसायटीचे संचालक घनःश्याम झाड, राजकोट मच्छीमार सोसायटीचे संचालक गणेश गावकर, भद्रकाली सोसायटीचे संचालक दादा धुरी, रोझरी मच्छीमार सोसायटीचे डेनिस, सिंधुदुर्ग सोसायटीचे सचिव मंडलिक, कांदळवन विभाग जैवविविधता उपजीविका तज्ज्ञ गुरुदास सावंत, सहाय्यक मत्स्य विकास अधिकारी तेजस्विता करंगुटकर, श्रुतिका गावडे, आश्लेषा गोळवणकर, परवाना अधिकारी मुरारी भालेकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page