आ नितेश राणेंनी घेतले कुलदेवता रामेश्वरचे दर्शन

खा राणे मंत्री झाल्याने कांदळगावात जात घेतले दर्शन

*💫मालवण दि.११-:* माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांची केंद्रीयमंत्री पदी निवड झाल्या निमित्त राणेंचे सुपुत्र, आमदार नितेश राणे यांनी रविवारी दुपारी कुलदैवत कांदळगावच्या रामेश्वराचे दर्शन घेतले. ना. राणे दिल्लीत असल्याने राणे कुटुंबियांच्या वतीने आ. राणे यांनी कांदळगावला भेट दिली. यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, माजी सभापती उदय परब, सरपंच सौ. उमदी परब, उपसरपंच आनंद आयकर, भाग्यश्री डिचवलकर, शक्ती केंद्र प्रमुख प्रसाद भोगले, मनोज परुळेकर, दादा परुळेकर, ट्रस्टचे अध्यक्ष शिवराम परब, भाऊ गुरव, निनाद भोगले, भाई मांजरेकर, रवी मालवणकर आदींसह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.

You cannot copy content of this page