*💫वेंगुर्ला दि.१०-:* शिरोडा गावातील बर्डेवाडी येथील रहिवासी, सामाजिक कार्यकर्ते वेंगुर्ले एसटी आगारातून चालक ते स्थानक प्रमुख तसेच चालक प्रशिक्षक इ.बढती घेवून सेवानिवृत्त झालेले पुष्पराज बर्डे (वय 60) यांचे आज शनिवारी पहाटे निधन झाले. एसटी महामंडळात काम करताना कामगारांच्या मनामनात मित्रासारखे मित्र म्हणून राहिलेले, प्रामाणिकपणे सेवा बजावणारे पुष्पराज बर्डे यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी व मुलगा असा परिवार आहे. माजी पंचायत समिती सदस्य मीनाताई बर्डे यांचे ते पती होत.
वेंगुर्ले एसटी आगाराचे सेवानिवृत्त आगारप्रमुख पुष्पराज बर्डे यांचे निधन
