सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला १०० ब्लड बॅग उपलब्ध

युवा रक्तदाता संघटना अध्यक्ष देव्या सूर्याजी यांनी वेधले होते लक्ष

*💫सावंतवाडी दि.१०-:* उपजिल्हा रुग्णालयात ब्लड बँकमध्ये रक्त स्टोर करण्यासाठी ब्लड बॅग्स उपलब्ध नसल्याने त्या उपलब्ध होण्यासाठी युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष दे व्या सूर्याजी यांनी यावर वैद्यकीय अधीक्षक डॉ. उत्तम पाटील यांचे लक्ष वेधले होते. या बॅग्स तात्काळ न मिळाल्यास भीक घालण्याचा इशारा देण्यात आला होता. याची दखल घेत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ श्रीपाद पाटील यांनी १०० बॅग्स चा पुरवठा केला असून, इतरही समस्या लवकरात लवकर दूर केल्या जातील असे आश्वासन दिले आहे.

You cannot copy content of this page