*💫कणकवली दि.१०-:* कणकवली तालुक्यातील बावशी जय मल्हार स्वयं.सहायत्ता महीला बचत गट यांनी बावशी गावाला स्वतंत्र मिळणारे रेशनिंग दुकानसाठी गेल्या वर्षी प्रस्ताव पुरवठा विभाग यांच्याजवळ सुपूर्द करण्यात आला होता. मात्र कालांतराने त्यांनी प्रस्ताव रद्द केल्याने जय मल्हार स्वयं.सहायत्ता महीला बचत गटाने पुरवठा विभाग यांच्या विरोधात आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे . या ठिकाणी जाण्यासाठी डांबरीकरण रस्ता नाही तसेच इतरांना दुर जावं लागणार म्हणून त्यांनी दुसरी जागा दाखविण्यात सांगितले होते परंतु या दोन ते तीन महिने कालावधीत कोरोनाचा प्रादूर्भाव एवढा मोठा होता की बचत गटाच्या महिला कोरोना बाधीत होत्या यामुळे आम्ही या काळात कुठे जावू शकलो नाही आणि याच कालावधीत पुरवठा विभागाने आमचा रेशनिंग दुकान प्रस्ताव रद्द करण्यात येत असल्याचे सांगितले या विरोधात आम्ही आमच्या तोंडवली बावशी ग्रामपंचायतीच्या आवारात जिल्हा पुरवठा विभाग यांच्या विरोधात आमआमरण उपोषणाला सुरुवात केली असल्याचे बचत गटाच्या प्रमुख स्नेहलता कांडर व इतर महीलांनी बोलताना सांगितले आहे. यावेळी. दोन्ही गावचे पोलिस पाटील , गावच्या सरपंच मनाली गुरव , उपसरपंच अशोक बोभाटे , रविंद्र बोभाटे , असलदे सरपंच पंढरी वायंगणकर, भाजपचे शक्तीकेंद्र प्रमुख भाई मोरजकर आदींनी उपोषणाला भेट देऊन पाठींबा दिला आहे.
बावशी महीला बचत गटाचा रेशनिंग प्रस्ताव रद्द केल्याने आमरण उपोषण सुरू
