मनाई आदेशाच्या पार्श्वभूमीवर दोडामार्ग शहरात दंगा काबू पथकातर्फे केले संचलन

*💫दोडामार्ग दि.१०सुमित दळवी-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यात नुकत्याच जाहीर झालेल्या मनाई आदेशाच्या पार्श्वभूमीवर दोडामार्ग शहरात पोलिसांनी संचलन केले. दंगा काबू पथकातर्फे संचलन केल्याची माहिती पोलीस निरीक्षक आर. नदाफ यांनी दिली आहे. जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी जिल्ह्यात मनाई आदेश लागू केलेले आहेत,याच आदेशाला अनुसरून अनेक नियमावली घालण्यात आली आहे. आज सकाळी दोडामार्ग शहरात संचलन करण्यात आले. पोलीस निरीक्षक आर. नदाफ यांच्या प्रतिनिधीत्वाखाली संचलन करण्यात आले.

You cannot copy content of this page