*पत्रकार प्रसन्न गोंदावळे यांनी नगरसेवक अँड.परिमल नाईक यांचे वेधले होते लक्ष
*💫सावंतवाडी दि.१०-:* सावंतवाडी सर्वोदयनगर येथील रस्त्यावर पावसामुळे मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. याचा वाहनधारक व नागरिकांना त्रास होत होता. याबाबत ग्लोबल महाराष्ट्र न्युज चॅनेलचे पत्रकार प्रसन्न गोंदावळे यांनी नगरसेवक अँड.परिमल नाईक यांचे लक्ष वेधले होते. याची त्वरित नगरसेवक नाईक यांनी दखल घेऊन सर्वोदयनगर येथील हे सर्व खड्डे तात्काळ बुजवण्यात आले. खड्डे बुजविल्याने वाहनधारक व नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. त्यामुळे पत्रकार प्रसन्ना गोंदावळे यांनी केलेल्या मागणीला अखेर यश आले असून गोंदावळे यांनी नाईक यांचे आभार मानले आहे.
