*💫सावंतवाडी दि.०९-:* शासन धोरणानुसार कोरोना मुक्त गावातील आठवी ते बारावी पर्यंतच्या शाळा सुरु करण्याच्या पार्श्वभूमीवर कलंबिस्त इंग्लिश स्कूल हायस्कूलच्या नविन व जुनी दोन्ही ईमारती, वर्गखोल्यां, प्रयोग शाळा, स्टाफ रूम, संगणक विभाग, स्वच्छतागृहे, परिसर व लगतची दुकाने, पोस्ट ऑफिस व परिसर नाॅनब्लिच प्रभावी सोलुशनने प्रेशरपंपच्या सह्याने फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्यात आले. या कार्यात तुषार बांदेकर, संतोष तळवणेकर, शिक्षक पी.टी पारवा, शिक्षकेतर कर्मचारी श्री महेश कलंबिस्तकर, संजय पालकर सहभागी झाले. पालकांच्यावतीने संजय पालकर यांनी पुढाकार घेतला. कोरोना बाधित झालेल्या नागरिका ना या स्कूल मध्ये विलगीकरण यासाठी ठेवण्यात आले होते. यामुळे येथे निर्जंतुकीकरण हे करणे अत्यंत गरजेचे होते. याबाबत कलंबिस्त इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक श्री ए. व्हि. जाधव, सहा. शिक्षक पी. टी. पारवा पालकांच्या वतीने संजय पालकर व ग्रामस्थानी आ. दीपक केसरकर आणि संजू विर्नोडकर टीमचे आभार मानले.
*कलंबिस्त इंग्लिश स्कूल मध्ये संजू विर्नोडकर टीमकडून निर्जंतुकीकरण…
