*💫कणकवली दि.०९-:* कणकवली एस टी आगारातील कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध झाली असून, 18 ते 45 वर्षे वयोगटासाठी कणकवली डेपो कर्मचारी वर्गासाठी 200 डोस उपलब्ध करण्यात आले आहेत. हे लसीकरण रा. प. विभागीय कार्यशाळा व कणकवली डेपो येथे होत असून यामध्ये एस टी कर्मचाऱ्यांना पहिला व दुसरा डोस देण्यात येणार आहे. एसटी विभागाच्यावतीने यंत्र अभियंता रमेश कांबळे यांनी कणकवली वैद्यकीय अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक सिंधुदुर्ग यांच्याकडे मागणी केल्यानुसार 200 डोस उपलब्ध झाले आहेत. हे लसीकरण मॅकेनिक, क्लार्क, वाहक, चालक व इतरही कर्मचाऱ्यांना असल्याचे कांबळे यांनी सांगितले. तसेच कणकवली तालुक्यात एकूण 500 पेक्षा जास्त कर्मचारी वर्ग असून आज 200 डोस उपलब्ध झाले आहेत अशी माहिती विभागीय कर्मचारी वर्ग अधिकारी लवू गोसावी यांनी दिली. यावेळी यंत्र अभियंता चालन रमेश कांबळे, विभागीय कर्मचारी वर्ग अधिकारी लवू गोसावी, डॉ. टाक, डॉ. चौगुले, अनघा बागवे, अनिल लोकरे उपस्थित होते.
कणकवली एस टी आगारातील कर्मचाऱ्यांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण सूरू
