एसटी कर्मचाऱ्यांचे लसिकरण सुरु
*💫सावंतवाडी दि.०९-:* भाजपचे सावंतवाडी शहर अध्यक्ष अजय गोंदावळे आणि सावंतवाडी नगरपालिकेचे नगरसेवक आनंद नेवगी यांनी काही दिवसांपूर्वी एस. टी. महामंडळाच्या कर्मचारी वर्गासाठी तसेच दिव्यांगांसाठी वेगळे लसीकरण राबवण्याची मागणी केली होती. या मागणीला यश आले असून, आज ठीक ठिकाणी प्रामुख्याने एस.टी महामंडळाचे कर्मचारी आणि दिव्यांग यांना लसीकरण केले जात आहे.
