*💫मालवण दि.०९-:* अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ठाणे शाखेच्या वतीने राज्यस्तरीय खुली ऑनलाईन एकपात्री अभिनय स्पर्धा २०२१ आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी स्पर्धकांनी मराठी भाषेतला कोणताही उतारा ( नाट्य प्रवेश, स्वगत, नाट्यछटा, स्वलिखील ) तीन ते पाच मिनिटांच्या व्हिडिओद्वारे अभिनित करायचा आहे. प्रवेशिका पाठविण्याची अंतिम तारीख १८ जुलै असून स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे रु. ३,०००, रु. २,०००, रु. १,००० अशी रोख पारितोषिके तसेच इतरांना उत्तेजनार्थ प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. स्पर्धेची माहिती नियम आणि प्रवेश अर्ज यासाठी स्पर्धा समन्वयक महेश सावंत – पटेल ( ८५९१५२६२९६ ) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
राज्यस्तरीय ऑनलाईन एकपात्री अभिनय स्पर्धेचे आयोजन
