*💫सिंधुदुर्गनगरी दि.०८-:* दिव्यांग व्यक्ती आणि परिवहन मंडळाचे कर्मचारी यांच्यासाठी उद्या लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्ती आणि परिवहन मंडळाचे कर्मचारी यानी या सत्राचा लाभ घ्यावा असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यानी केले आहे. या सत्रासाठी पुढिलप्रमाणे लस उपलब्ध असणार आहेत. उपजिल्हा रुग्णालय कनकवली 200, ग्रामीण रुग्णालय देवगड 100, जामसंदे 100, शिरगाव पिएचसी 100, ग्रामीण रुग्णालय मालवण 90, पणदूर पीएचसी 90, सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय 140 आणि वेंगूर्ला ग्रामीण रुग्णालय 50 अशा एकूण 870लसी उपलब्ध असणार आहेत.
एस.टी. महामंडळाचे कर्मचारी व दिव्यांगासाठी लसीकरण सत्र
