…अन्यथा भारतीय विद्यार्थी मोर्चा संपूर्ण महाराष्ट्रात सरकार विरोधात करणार तीव्र आंदोलन

भारतीय विद्यार्थी मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रतिक जाधव यांचा निवेदनाद्वारे सरकारला इशारा*

*💫सावंतवाडी दि.०६-:* कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्यावर्षी पासून स्पर्धा परीक्षा रखडल्या असून, २०१९ साली राज्य सेवा आयोगाच्या प्राथमिक आणि मुख्य परीक्षेत पास झालेल्या स्वप्नील लोणकर या युवकाने मुलाखत गेली अडीज वर्ष न झाल्याने घरची हलाखीची परिस्थिती आणि शिक्षणासाठी घेतलेले कर्ज व बेरोजगारी या सर्वाला कंटाळून आत्महत्या केली होती. असे प्रकार पुन्हा घडू नयेत यासाठी भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या वतीने सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे विविध मागण्या केल्या आहेत. यावेळी सदर युवकाच्या कुटुंबाला १ कोटीची आर्थिक मदत करून, कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी द्यावी, तसेच परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना लवकरात लवकर सेवेत सामावून घ्यावे, रिक्त पदे तातडीने भरावी, कोरोणामुळे स्पर्धा परीक्षा होत नसल्याने वयोमर्यादा ओलाडणाऱ्या विद्यार्थ्यांना २ वर्षाची मुभा देण्यात यावी, अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. यावेळी ह्या मागण्या पूर्ण न झाल्यास संपूर्ण महाराष्ट्रात सरकार विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे भारतीय विद्यार्थी मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रतिक जाधव यांनी दिला आहे. यावेळी उपजिल्हाध्यक्ष सुरज कांबळी, सचिव अनिकेत जाधव, सदस्य अथांग जाधव, संजय जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page