शिवडाव येथे स्वतःला पेटवून घेवून महिलेची आत्महत्या

*💫कणकवली दि.०६-:* कणकवली तालुक्यातील शिवडाव चिंचाळवाडी येथील एका महिलेने राहत्या घरी स्वतःला पेटवून घेवून आत्महत्या केली. गंभीररित्या जखमी झाल्याने तिचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास घडली. मात्र, तिच्या आत्महत्येमागचे निश्चित कारण अजून स्पष्ट झालेले नाही. सबंधित महिलेच्या घरातील सर्व जण मंगळवारी शेतात काम करण्यासाठी गेले होते. याच दरम्यान शेतातून त्या महिलेचा मुलगा घरी चहा घेण्यासाठी आला होता. त्यावेळी त्याने घराच्या पडवीत पाहिले असता, संबंधित महिला जळालेल्या अवस्थेत त्याला दिसून आल्या. त्याने याबाबतची माहिती कुटुंबियांना दिली. त्यांनी घरी येऊन पाहिले असता गंभीर भाजल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. या घटनेची माहिती शिवडाव पोलीस पाटील यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिली. कणकवली पोलिस उपनिरीक्षक अनमोल रावराणे यांच्यासह पोलीस हवालदार ममता जाधव यांनी घटनास्थळी जावून माहीती घेतली. ही घटना नोंद करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत कणकवली पोलीस ठाण्यात सुरू होती.

You cannot copy content of this page