*तहसीलदार म्हात्रे यांच्याकडे निवेदनाद्वारे आंबोली वासियांची मागणी*
*💫सावंतवाडी दि.०६-:* आंबोली पर्यटन व्यवसाय पूर्णपणे बंद पडल्यामुळे पर्यटनावर अवलंबून असलेल्या हॉटेल व्यवसायिक सध्या मेटाकुटिला आले आहे. तीन वर्षांपूर्वी आंबोली घाटात दरड कोसळल्यामुळे आणी आता कोरोनचा सावट असल्यामुळे व्यवसायिक आचे प्रचंड हाल झाले आहेत त्यामुळे आता तरी व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी आंबोलीतील व्यवसायिकांनी आज तहसीलदारांना निवेदन द्वारे दिले आहे. यावेळी सरपंच गजानन पालेकर, उपसरपंच सदाशिव उर्फ दत्तू नार्वेकर महेश पावसकर, दशरथ गावडे, गोपाळ गावडे, रमेश राऊळ, विश्वास सावंत आदी उपस्थित होते.
