माड्याची वाडीत पाट – म्हापण रस्त्यावर पडलेला खड्डा देतोय अपघातास निमंत्रण

बांधकाम विभागाने त्वरित बुजविण्याची मागणी

*💫कुडाळ दि.०६-:* कुडाळ ते पाट- म्हापण मार्गावर माड्याची वाडी गावात असलेल्या करमळगाळू मार्गावरील एका वळणावर मार्गाच्या मधोमध भला मोठा खड्डा पडलेला आहे. गेली अनेक दिवस या मार्गावर पडलेल्या या भगदाडामुळे जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतआहे. एवढेच नव्हे तर गावात शेतीची कामे सुरू आहेत. याच मार्गाने गावातील जनावरांना नेत असताना अनेक शेतकऱ्यांना त्रास जाणवला आहे. काही ग्रामस्थांनी या भल्यामोठ्या पडलेल्या भगदाडात दगड भरून मिटवण्यासाठी प्रयत्न केले आहेत, परंतु ऐन वळणावर असलेल्या भगदाडामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांमध्ये अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे येथील ग्रामस्थांकडून शासनाने लवकरात लवकर यावर उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी केली आहे. वेळी त्यावर तोडगा नाही काढला तर ग्रामस्थांकडून रस्ता आंदोलन केले जाईल असे माड्याचीवाडी करमळगाळू येथील ग्रामस्थांनी यावेळी सांगितले आहे.

You cannot copy content of this page