आम.भास्कर जाधव हे संकासुर

आम.नितेश राणे यांची ट्विट करीत टीका

*💫कणकवली दि.०६-:* रडीचा डाव खेळून भाजपच्या १२ आमदारांना निलंबित करणाऱ्या शिवसेनेचे उपेक्षित नेते तथा प्रभारी तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्यावर भाजपचे युवा नेते, आमदार नितेश राणे यांनी कडवट टीका केलीय. भास्कर जाधव हा संकासुर असल्याची प्रतिक्रिया आ. राणे यांनी ट्विटरवर दिली आहे. सोमवारपासून सुरू झालेल्या दोन दिवसीय विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात गोंधळ घातल्याने भाजपच्या १२ आमदारांचे भास्कर जाधव यांनी निलंबन केले. या आमदारांनी आपणाला शिवीगाळ केल्याचा आरोप विधिमंडळाचे प्रभारी अध्यक्ष भास्कर जाधव यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर नितेश राणे यांनी ट्विटर वरून भास्कर जाधव यांच्यावर जोरदार टिका केली आहे. “आ.भास्कर जाधव हा संकासुर आहे !!! कोकणच्या दशावतारात संकासुराने ४ वेद, ६ शास्त्र आणि १८ पुराणे चोरून समुद्राच्या तळाशी शंकात जाऊन लपला. त्याच प्रमाणे भास्कर जाधव यांनी, संविधानाने आमदारांना दिलेले अधिकार चोरून नेले आणि निलंबनाची कारवाई केली आहे!!!” असं ट्विट नितेश राणे यांनी केलं आहे.

You cannot copy content of this page