भाजपा आमदारांच्या निलंबनाच्या कृतीचा जिल्हा भाजपकडून निषेध

ठाकरे सरकारने ओबीसी आरक्षणावरून सर्व तत्वे तुडवली पायदळी;जिल्हाध्यक्ष राजन तेलिंचा आरोप

*💫सावंतवाडी दि.०६-:*   राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरु झाल्यानंतर ओबीसी आरक्षणावरून ठाकरे सरकारने सर्व तत्वे पायदळी तुडवून भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन केले असून, सरकारच्या या निर्णयाचे भाजप कडून जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आयोजित पत्रकार परिषद जाहीर  निषेध केला आहे.

भाजप ओबीसी आरक्षण मिळावे यासाठी सुरुवातीपासून त्याच्या बाजूने होते. परंतु, राज्य सरकारने गेले १५ महिने काहीही केले नाही. असा आरोप पत्रकार परिषदेत राजन तेली यांनी केला आहे. अध्यक्षपदात काहीतरी दगा फटका होईल याच भीतीने राज्य सरकारने या १२ आमदारांचे निलंबन केले असल्याचे देखील ते यावेळी म्हणाले आहेत. या निलंबन विरोधात संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तहसीलदार कार्यालयात आणि जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात येणार आहे. अशी माहिती देखील यावेळी राजन तेली यांनी दिली आहे. 
सरकार सर्वच बाजूने अपयशी ठरले आहे. तिन्ही पक्षात ताळमेळ नसल्यानेच राज्यात मोठ्या संख्येने बळी गेले आहेत. त्यामुळेच यावेळी अधिवेशन देखील २ दिवसांचे भरवण्यात आले आहे. सरकार सर्व बाबतीत उघडे पडेल, त्यामुळे घाबरत असून, ५ पेक्षा जास्त दिवस एकही अधिवेशन या राज्य सरकारच्या काळात झाले नाही. पुढच्या काळात राज्य सरकार विरोधात भाजप आक्रमक  भूमिका घेणार असल्याचे पण त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. 
यावेळी शहर अध्यक्ष अजय गोंदा वळे, नगरसेवक आनंद नेवगी, नगरसेवक मनोज नाईक, महेश धुरी, बंटी पुरोहित आदी पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page