आरक्षण प्रश्न मिटवा अन्यथा राष्ट्रीय समाज पक्ष आंदोलन करेल
*💫कणकवली दि.०६-:* ओबीसी समाज व इतर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा व तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूक घेऊ नयेत अन्यथा भविष्यात आंदोलन तीव्र करण्याचा इशारा राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाप्रमुख शिवाजी जंगले व जिल्हा प्रभारी राजेंद्र माने यांनी दिला आहे. याबाबत सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती शुभांगी साठे यांना निवेदन देण्यात आले. महाविकास आघाडी सरकारच्या ओबीसी आरक्षण धोरणाचा विरोध म्हणून आम. महादेव जानकर, आम. रत्नाकर गुट्टे, माजी राज्यमंत्री बाळासाहेब दोडतले यांच्या नेतृत्वाखाली 4 जुलैला राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने राज्यभर चक्काजाम व जेलभरो आंदोलन करण्यात आले. त्याचाच एकभाग म्हणून हे निवेदन देण्यात आले.
