*बहुजन मुक्ती पार्टीचे वीजबिल माफिसाठी उद्या कंदील भेट आंदोलन

*बहुजन मुक्ती पार्टी जिल्हाध्यक्ष लाडू जाधव यांची माहिती

*💫सावंतवाडी दि.०५-:* महाराष्ट्रात लॉक डाऊन मुळे जनता संकटात सापडलेली आहे. त्यामुळे राज्य सरकारने थकित वीज बिल माफ करून नवीन बिल आकारणी योग्य रित्या करण्यात यावी यासाठी बहुजन मुक्ती पार्टी युवा आघाडी व बहुजन मुक्ती पार्टी महिला आघाडीकडून उद्या दिनांक ६ जुलै २०२१ रोजी संपूर्ण महाराष्ट्र मध्ये एकाच वेळी जिल्हाधिकारी कार्यालय आणि तहसीलदार कार्यालयावर आंदोलन करण्यात येणार असून, यावेळी कंदील भेट देऊन हे आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी २०० युनिट पर्यंत विज बिल माफ करण्यात यावे, मिटर भाड्यात कपात करण्यात यावी, विजेचा स्थिर आकार वर प्राथमिक भाव प्रमाणे दर आकारणी करावी, सक्तीची विज बिल वसुली तात्काळ थांबवावी, ३० दिवसानंतर रीडिंग घेणाऱ्या व्यक्तीवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशा विविध मागण्यासाठी उद्याचे आंदोलन करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती बहुजन मुक्ती पार्टी जिल्हाध्यक्ष लाडू जाधव यांनी दिली आहे.

You cannot copy content of this page