संशयिताला कोठडी
*💫कणकवली दि.०३-:* कणकवली तालुक्यातील कनेडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जवळून चंद्रशेखर चिंतामणी कुलकर्णी यांची दुचाकी चोरी केल्याप्रकरणी संशयित आरोपी राजू मुकुंद पाटले ( ३९ रा. सौदळ , देवगड ) याला कणकवली पोलीसांनी अटक केली. न्यायालयात हजर केले असता २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. चंद्रशेखर कुलकर्णी यांची दुचाकी चोरीस गेल्याची घटना ४ एप्रिल रोजी सायंकाळी ७.४५ वाजण्याच्या सुमारास घडली होती. या तपासाअंती ही दुचाकी विजयदुर्ग येथे सापडून आली. तसेच त्या आरोपीचा शोध घेत असता तो आरोपी रत्नागिरी येथे असल्याची माहिती समजली . त्यावेळी तेथून त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. तसेच शुक्रवारी त्याला कणकवली न्यायालयात हजर केले असता २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.
