कळसुली प्राथमिक आरोग्य केंद्राला ऑक्सिजन कॉन्सट्रेटर व पीपीई किट

सतीश सावंत यांचा ना.सुभाष देसाई यांच्याकडे पाठपुरावा

*💫कणकवली दि.०३-:* कोरोना धोका अद्याप टळला नसल्याने खबरदारीचा उपाय म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांच्या मागणीनुसार उद्योगमंत्री ना. सुभाष देसाई यांच्याकडून ऑक्सिजन कॉन्सट्रेटर कळसुली प्राथमिक आरोग्य केंद्राला प्रदान करण्यात आला. तसेच पीपीई किट सुपूर्द करण्यात आली. सिंधुदुर्गात आरोग्य सेवेसाठी आवश्यक ते साहित्य मिळावे अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी राज्याचे उद्योगमंत्री ना. सुभाष देसाई यांच्याकडे केली होती.त्यानुसार हे साहित्य उपलब्ध झाले आहे. ऑक्सिजन कॉन्सट्रेटर कळसुली प्राथमिक आरोग्य केंद्राला प्रदान करतानाआमदार वैभव नाईक, कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर, उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, उपतालुकाप्रमुख राजू राणे,विभागप्रमुख रुपेश आमडोसकर, सरपंच साक्षी परब,माजी सरपंच अतुल दळवी, सुशांत दळवी, राजू राठोड, ललित घाडीगावकर, शाखाप्रमुख बाळा नाईक, भास्कर राणे, डॉ. पोळ व आरोग्य कर्मचारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी बोलताना सतीश सावंत म्हणाले, आरोग्य समस्या सोडवण्यासाठी शासनाच्या माध्यमातून आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जातील. जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी शासन सक्षम असून या पुढच्या काळात ज्या समस्या आहेत त्या दूर करण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू अशी ग्वाही यावेळी सतीश सावंत यांनी दिली

You cannot copy content of this page