मालवण प स चा उद्या चिंदर येथे कृषि दिन

मालवण दि प्रतिनिधी हरितक्रांतीचे प्रणेते, माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त साजऱ्या होणाऱ्या कृषी दिनानिमित्त मालवण पंचायत समितीच्या वतीने चिंदर ग्रामपंचायत येथे गुरुवारी दि. १ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता तालुकास्तरीय कृषी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे उपस्थित राहणार असल्याची माहिती सभापती अजिंक्य पाताडे यांनी दिली. सकाळी १०. ३० वाजता वृक्षारोपण, प्रमाणपत्र वितरण व मार्गदर्शन होणार आहे. तर चिंदर येथील दत्त मंदिर समोर दु. १२ वा. बचत गटांना बियाणे वाटप व लागवड प्रात्यक्षिक होणार आहे.. यानंतर किल्ले भगवंतगड येथे वृक्षारोपण मोहीम व मुलांनी जमा केलेल्या वृक्ष बियांचा सीड बॉल फेकण्याचा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती सभापती श्री. पाताडे यांनी दिली आहे.

You cannot copy content of this page