राष्ट्रवादी काँगेसचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी केली होती पाहणी
*💫सावंतवाडी दि.३०-:* कोरोनाच्या काळात शासनाकडून सर्वसामान्य जनतेला देण्यात आलेले मोफत धान्य निकृष्ट दर्जाचे असल्याचा खळबळजनक प्रकार मडूरे येथे उघडकीस आल्यानंतर काल तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी गोदामाला भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली होती. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग व व्यापार जिल्हाध्यक्ष तथा सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी आज पुन्हा त्या गोदामाची पाहणी केली होती. या दोन्ही वेळा तेथील धान्य चांगल्या प्रतीचे असल्याचे दिसून आले आहे. यावेळी रास्त धान्य दुकानात चांगल्या प्रतीचे धान्य न मिळाल्यास ग्राहकांनी ते नाकारावे ते धान्य त्या दुकानदारांस परत करावे असे आवाहन पुंडलिक दळवी यांनी केले आहे. यावेळी त्यांच्यासह शहर अध्यक्ष देवेंद्र टेमकर, युवक तालुका अध्यक्ष राजू धारपवार, संतोष जोईल, हिदायतुल्ला खान आदी पदाधिकारी उपस्थित होते.
