रेडीत दिव्यांग बांधवाना खाण कंपनीकडून सायकल भेट

आय.एल. पी.एल. कंपनीचा उपक्रम

*💫वेंगुर्ले दि.३०-:* आय. एल. पी. एल. खान कंपनी तर्फे रेडी येथील दिव्यांग बांधवाला तीन चाकी सायकल भेट देण्यात आली.रेडी येथील आय एल पी एल खान कंपनी कायमच सामाजिक उपक्रम राबवत असताना रेडी गावातील दिव्यांग बंधव प्रमोद काळोजी यांना कंपनीतर्फे तीन चाकी सायकल कंपनीचे अधिकारी श्री नायडू यांचे हस्ते देण्यात आली. या दिव्यांग बांधवाला सायकल मिळवून देण्यासाठी शिवसेना तालुका संघटक संतोष मांजरेकर यांनी प्रयत्न केले होते. रेडीतील दिव्यांग बांधव श्री प्रमोद काळोजी यांना कंपनीचे अधिकारी श्री नायडू आणि तालुका संघटक श्री संतोष मांजरेकर यांच्या हस्ते तीन चाकी सायकल भेट देण्यात आली.. सदरचा कार्यक्रम रेडी शिवसेना शाखेच्या वतीने करण्यात करण्यात आला. यावेळी आय. एल. पी. एल. कंपनीचे अधिकारी श्री नायडू, संतोष मांजरेकर, रेडी गावचे उपसरपंच नामदेव राणे, ग्रा. सदस्य शिल्पा वस्त, शाखप्रमुख विनोद राणे, नंदकुमार मांजरेकर, प्रसाद रेडकर, विजय वस्त, दाजी काळोजी, दर्शन कांबळी, नाना कांबळी, व ग्रामस्थ उपस्थित होते.

You cannot copy content of this page