मी आणि धनंजय मुंडे स्वतः मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार;राष्टवादी काँगेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे आश्वासन
*💫सावंतवाडी दि.२९-:* पत्रकार नेहमी जीव धोक्यात घालून मागील वर्षापासून कोविड काळात काम करीत आहेत, त्यामुळे पत्रकार संघाने केलेली मागणी योग्य असून दौरा आटोपल्यानंतर आपण स्वतः आणि धनंजय मुंडे पत्रकारांना फ्रेन्ट लाईन वर्कर म्हणून मान्यता देण्यात यावी अशी मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी करणार असल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी आश्वासन दिले आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या परिवार संवाद यात्रेनिमित्त ना जयंत पाटील व ना धनंजय मुंडे हे हिंगोली दौऱ्यावर आले होते, यानिमित्ताने दि 29 जून मंगळवार रोजी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते .याप्रसंगी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष नंदकिशोर तोष्णीवाल यांनी पत्रकारांच्या विविध मागण्यांसंदर्भात भूमिका मांडली तर या कोरोना काळामध्ये पत्रकारांना फ्रंटलाइन वर्कर्स ची मान्यता द्यावी अशी मागणी केली, तेव्हा पाटील म्हणाले की ही मागणी योग्य आहे यासंदर्भात दौरा आटोपल्यानंतर आम्ही दोघे मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन राज्यभरातील पत्रकारांची ही मागणी त्यांच्यापुढे मांडू, सध्या मुबलक लस उपलब्ध आहेत तेव्हा पत्रकारांना प्राधान्याने कोरोना लस दिल्या जातील असे त्यांनी सांगितले, तेव्हा तोष्णीवाल ह्यांनी हा मुद्दा फक्त लसीं पुरता नसुन फ्रंटलाइन वर्कर्स म्हणून मान्यता दिल्यास दुसऱ्या फ्रंटलाइन वर्करच्या अनेक सवलतींचा लाभ पत्रकारांना घेता येईल असे सांगितले , यावेळी मराठी पत्रकार संघाचे पदाधिकारी व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
