*💫सावंतवाडी दि.२८-:* गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या घेवरचन्द बिष्णोई (वय.30,रा राजस्थान) या युवकाला आज न्यायालयात हजर केले असता, न्यायलयाने २५ हजार रुपयांच्या जामिनावर त्या युवकाची सशर्त मुक्तता केली आहे. याकामी अँड परशुराम चव्हाण यांनी काम पाहिले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, गोव्याहून राजस्थानला जाणाऱ्या कंटेनरवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी कारवाई करत कटेंनर आणि दारूसह एकूण २४ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. यावेळी वाहतूक केल्यारक्रणी अटक करण्यात आलेल्या घेवरचन्द बिष्णोई या युवकाला अटक करत न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायलयाने त्या युवकाला जामीन मंजूर करण्यात आला आहे.
*गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी आरोपीस सशर्त जामीन मंजूर*
