*जिल्हा परिषद सदस्य तथा शिवसेना गटनेता नागेंद्र परब यांची मागणी
*💫कुडाळ दि.२८-:* : जिल्हा परिषद स्वनिधीतून सरपंचांप्रमाणे उपसरपंचांनाही कोविड-१९ पार्श्वभूमीवर विमाकवच देण्यात यावे, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य तथा शिवसेना गटनेता नागेंद्र परब यांनी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनात परब यांनी म्हटले की, जिल्हा परिषद स्वनिधीतून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व सरपंचांना कोविड-१९ पार्श्वभूमीवर विमा कवच देण्यात आले आहे. प्रत्येक गावात सरपंचांबरोबर उपसरपंच हे सुद्धा कोविड प्रतिबंधक उपाययोजनेचे गावागावात जाऊन काम करीत आहेत. तरी जिल्हा परिषद स्वनिधीतून सरपंचांना देण्यात आलेल्या विमाकवचाप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व उपसरपंचांना विमाकवच देण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
