*💫कणकवली दि.२६-:* कोरोना महामारीमुळे नऊ महीन्यांची टाळेबंदी आणि उर्वरीत कालावधीतील एस. टी. ची अत्यल्प प्रवासी सेवा वाहतूकीमुळे राज्यभरातील बस स्थानकांतील आस्थापनाधारक सर्वं दुकानदार आर्थिकद्दष्या मेटाकुटीस आले आहेत. त्यांचे नऊ महीन्यांचे परवाना शुल्क (भाडे) पुर्णपणे माफ करावे आणि एस. टी. ची प्रवासी सेवा वाहतूक पुर्ववत १०० टक्के सुरू होईपर्यंंत १५ टक्केच एवढीच शुल्क आकारणी करावी यासाठीचे साकडे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना एस. टी. कँन्टीन आणि स्टाँलधारक परवानाधारक असोसिएशनने घातले आहे. असोसिएशनचे अध्यक्ष राम हरल, कार्याध्यक्ष विजय ऐताल यांनी मुंबईतील पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या बंगल्यावर जाऊन परवानाधारकांच्या शुल्क माफी संदर्भातील निवेदन सादर केले. त्यांच्या स्वीय सहाय्यकाने हे निवेदन मंत्र्यांकडे दिले. त्यांनी निवेदन वाचून आपण यासंबधी परिवहन मंत्री अँड. अनिल परब यांच्याशी सोमवारी २८ जूनला चर्चा करून निर्णय घेतो असा निरोप पदाधिकार्यांना दिला. या निवेदनात परवानाधारक दुकानदारांवर ओढविलेल्या आर्थिक आपत्तीची सविस्तर माहीती देण्यात आली आहे.
एस. टी. परवानाधारकांचे शुल्क माफीसाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंना साकडे
