रेवतळे येथील विवाहितेचा विजेच्या धक्याने निधन

पोलिसांत आकस्मित मृत्यु म्हणून नोंद

*💫मालवण दि.२४-:* मालवण रेवतळे आदर्शनगर येथील सौ. साक्षी संदीप आचरेकर (वय ४५) वर्षीय विवाहितेचा गुरुवारी सकाळी घरात विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. याप्रकरणी विवाहितेचा भाऊ लिंगेश्वर लवू नवलकर यांनी मालवण पोलीस स्थानकात दिलेल्या माहितीनुसार आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सौ. साक्षी सकाळी घरात भांडी, कपडे धुण्यासाठी जात असताना दरवाजावर असलेली एक वायर खाली आली होती. त्या वायरला त्यांचा स्पर्श झाल्याने त्याचा शॉक लागून त्या खाली पडल्या. याबाबत शेजारी व्यक्तीने साक्षी यांच्या नातेवाईकांना माहिती दिली. नातेवाईकांनी त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तपासणी अंती त्यांना मृत घोषित करण्यात आले. शवविच्छेदन अहवालात साक्षी हीचा मृत्यू हाताला शॉक लागून झाल्याचे स्पष्ट झाले. अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक बालाजी पाटील यांनी दिली आहे. वीज कर्मचारी यांनीही घटनास्थळी भेट देत पाहणी करून खात्री केली. पोलीस उपनिरीक्षक सचिन पाटील, पोलीस कर्मचारी विलास टेंबुलकर अधिक तपास करत आहेत, अशी माहिती मालवण पोलीस निरीक्षक एस एस ओटवणेकर यांनी दिली. मयत साक्षी यांच्या पश्चात पती, मुले असा परिवार आहे. साक्षी आचरेकर या टेलरिंगचा व्यवसाय करायच्या. वटपौर्णिमेच्या दिवशीच त्यांचे दुर्दैवी अकाली निधन झाल्याने मालवणात हळहळ व्यक्त होत आहे.

You cannot copy content of this page