*💫बांदा दि.२४-:* बांद्याचे सुपुत्र आणि सध्या अमेरिकेत स्थायिक असलेले उच्च विद्याभूषित शंकर विजय सावंत यांनी बांद्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राला ऑक्सिजन काँसेटरेटर भेट दिला आहे. त्याचा लोकार्पण सोहळा आज शंकर सावंत यांच्या मातोश्री श्रीमती सुमन विजय सावंत यांच्या हस्ते करण्यात आला. यामुळे बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात येणाऱ्या रुग्णांची सोय झाली आहे. बांद्याचे शंकर सावंत हे अमेरिकेत स्थायिक आहेत, मात्र कोरोना काळात बांद्यातील रुग्णांसाठी काहीतरी मदत करावी या उदात्त हेतूने त्यांनी ऑक्सिजन काँसेटरेटर ब्रांदा प्राथमिक केंद्राला दिला. बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ मयुरेश पटवर्धन यांच्याकडे हा ऑक्सिजन काँसेटरेटर सुपूर्द करण्यात आला. यावेळी शंकर सावंत यांच्या मातोश्री सुमन सावंत, बांदा सरपंच अक्रम खान, जिल्हा परिषद सदस्य श्वेता कोरगावकर, उपसभापती शीतल राऊळ ग्रामपंचायत सदस्य मकरंद तोरसकर, तलाठी वर्षा नाडकर्णी, महिला पोलीस ज्योती हरमलकर, माजी सरपंच बाळा आकेरकर, भाजप शहर अध्यक्ष राजा सावंत, सुधीर शिरसाट, सुनील धामापूरकर आदी उपस्थित होते
बांद्याचे सुपुत्र शंकर सावंत यांच्या हस्ते बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राला ऑक्सिजन काँसेटरेटर भेट
