रूग्णवाहीका वाहन चालकांना विमा सुरक्षा कवचाचे आम.नितेश राणे यांच्याहस्ते वितरण

कणकवली सभापती मनोज रावराणे यांनी राबविला उपक्रम

*💫कणकवली दि.२२-:* आम.नितेश राणे यांच्या संकल्पनेतून व कणकवली पंचायत समिती सभापती मनोज रावराणे यांच्या पुढाकाराने कणकवली तालूक्यातील 7 प्राथमिक आरोग्य केंद्रातील व उपजिल्हा रूग्णालयातील 2 असे एकूण 9 रूग्णवाहीकांवरील वाहन चालकांना सुरक्षा कवच म्हणून कोरोना काळात विमा संरक्षण देण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ आम.नितेश राणे यांच्याहस्ते करण्यात आला. विमा संरक्षण सभापती मनोज रावराणे यांनी स्वखर्चाने केलेले असून त्यामुळे कणकवली तालूक्यातील रुग्णवाहिका वाहन चालकांना यांचा लाभ मिळाला असून त्यांनी समाधान व्यक्त केले. कणकवली येथील आम. नितेश राणे यांच्या ओम गणेश निवासस्थानी आयोजित कार्यक्रम प्रसंगी प्रतिनिधीक स्वरूपात रुग्णवाहिका चालकांना विमा कवचाचे वितरण करण्यात आले. यावेळी कणकवली पंचायत समिती सभापती मनोज रावराणे, भाजपा ग्रामीण मंडळ कणकवली तालुकाध्यक्ष संतोष कानडे, माजी उपसभापती महेश गुरव,वागदे माजी सरपंच संदीप सावंत ,भाजपा कणकवली शहराध्यक्ष अण्णा कोदे,सोनू सावंत, बापू सावंत व अन्य उपस्थित होते. कोरोनाच्या पाश्वभूमीवर शासनाने कोरोनामध्ये प्राधान्यान काम करणाऱ्यासाठी सुरक्षा कवच म्हणून विमा योजना सुरु करण्याचे आदेश दिले परंतू या कोराणाच्या महामारीमध्ये प्रामुख्याने रुग्णांची जवळून सेवा बजावणाऱ्या रुग्णवाहीकांच्या वाहन चालकांकडे कोणीही लक्ष दिलेले नाही . परंतू प्रथमच जिल्हयात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात आम.नितेश राणे यांच्या संकल्पनेतून व कणकवली पंचायत समिती सभापती मनोज रावराणे यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला.रूग्णवाहीकेवरील वाहन चालक आपल्या जिवाची पर्वा न करता अहोरात्र सेवा बजावीत असतो आणि हा घटक कुठेतरी दुलक्षीत राहू नये व त्यांना भविष्यामध्ये विमा योजनेचा त्याला आधार असावा याच भावनेने सभापती मनोज रावराणे यांनी हा विमा काढलेला आहे. यावेळी रुग्णवाहिका चालक मारुती जोशी ,निलेश राणे,योगेश सुतार,अजित सापळे,प्रविण चव्हाण,निलेश चिंदरकर,व्हा.एम.मोचेमांडकर,डी. बी.पांचाळ, श्री.गजोबार,आदींना कोरोना काळातील विमा कवच आम.नितेश राणे यांच्या सुपूर्त करण्यात आले.

You cannot copy content of this page