राजू मुळीक : आरोस गिरोबा विद्यालयात विलगिकरण कक्ष सुरू
*💫बांदा दि.२२-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यासह भारतात दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी होत आहे. मात्र अद्यापही रुग्णसंख्या व मृत्युचे प्रमाणही चिंताजनकच आहे. या पार्श्वभूमीवर संशोधकांनी तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवलेली आहे. त्यासाठी आरोस गावासह जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करत तिसऱ्या लाटेला परतवून लावण्याचे आवाहन, जि.प.सदस्य राजन उर्फ राजू मुळीक यांनी केले. आरोस गिरोबा विद्यालयात पंधरा बेडचे नियोजन करत विलगीकरण कक्षाच्या उद्घाटनप्रसंगी राजू मुळीक बोलत होते. आरोस सरपंच शंकर नाईक, ग्रा.पं.सदस्य प्रसाद नाईक, विश्वजीत कळंगुटकर, युवासेना सावंतवाडी तालुकाप्रमुख योगेश नाईक, पोलिस पाटील महेश आरोसकर, केंद्रप्रमुख कमलाकर ठाकूर, मुख्याध्यापक लेम सर, सर्व आशाताई, अंगणवाडी सेविका, सीआरपी, ग्रामपंचायत कर्मचारी, गाव कोरोना नियंत्रण समिती, शिक्षक वर्ग, कृती समिती व आरोग्य कर्मचारी तसेच रामचंद्र नाईक, दत्ताराम नाईक, राजन नाईक, विजय नाईक, शैलेश नाबर, प्राणेश नाईक, भाई रेडकर, अमर घोगळे, रविंद्र नाईक, सत्यवान नाईक, दयानंद नाईक, शुभम नाईक आदी उपस्थित होते. सरंपच शंकर नाईक म्हणाले की, सद्यस्थितीत गावात तीन सक्रिय रुग्ण आहेत. अनेक रुग्णांनी मात केली आहे. आठ बेड, मनोरंजनासाठी टीव्ही व इंटरनेटची मोफत सेवा सद्यस्थितीत आम्ही विलगिकरण कक्षात दिली आहे. जि.प.सदस्य राजन मुळीक यांनी दहा हजार रुपये तर अमर घोगळे यांनी ऑक्सिजनचे दोन सिलिंडर विलगीकरण कक्षासाठी दिले असल्याचे श्री. नाईक म्हणाले.
