शरद पवार यांच्या अत्यंत विश्वासातील खंदा समर्थक म्हणजे ‘अमित सामंत’

एनएसयूआय पासून सुरु आहे वाटचाल;सामंतांनी पडत्या काळात राष्ट्रवादीला उभारी देण्याचा सुरु केलाय प्रयत्न

*💫सिंधुदुर्ग दि.२१ प्रसन्न गोंदावळे-:* राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांचा आज वाढदिवस. ग्लोबल महाराष्ट्र न्युज चॅनेलच्या माध्यमातून त्यांच्या कार्याचा घेतलेला हा धावता आढावा एनएसयुआय पासून राजकिय वाटचाल सुरू केलेले व शरद पवार यांचे खंदे समर्थक असलेले अमित सामंत आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या पडत्या काळात समर्थपणे राष्ट्रवादीची धुरा आपल्या खांद्यावर घेऊन सांभाळत आहेत. जिल्ह्यातील रथी महारथी राष्ट्रवादीतून बाहेर पडल्यावर राष्ट्रवादी जिल्ह्यात बॅकफुटवर गेली असताना सिंधुदुर्गात राष्ट्रवादीला एकसंध बांधण्याचे काम अमित सामंत यांनी केले आहे. ९० च्या दशकात जेव्हा शिवसेना मुंबईत जोमात होती तेव्हा काँग्रेसच्या एनएसयुआय संघटनेतून शिवसेनेच्या वादळापुढे सलग तीन वर्षे महाविद्यालयात यूआर म्हणून निवडून आले होते. शरद पवार यांच्यासोबत विद्यार्थी दिशेपासून जे दोन खंदे समर्थक होते ते म्हणजे जितेंद्र आव्हाड आणि अमित सामंत. पवार कुटुंबियांच्या अत्यंत विश्वासातील म्हणून ते सर्वज्ञात आहेत. शरद पवार, अजित पवार, सुप्रियाताई सुळे, रोहित पवार पर्यंत सर्वांशीच त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत. निष्ठावंत पवारप्रेमी असलेले अमित सामंत हे स्पष्टवक्ते असून अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून ते ओळखले जातात. प्रशासकीय अधिकाऱ्यांशीही त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत. विचारांची लढाई विचाराने लढण्यास ते प्राधान्य देतात. अतिशय दांडगा लोकसंपर्क असल्याने जिल्हाभरात त्यांना मानणारा वर्ग आहे. अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर त्यांनी जिल्ह्यातील नेत्यांमधील पक्षांतर्गत मतभेद दूर करण्यास यश मिळविले आहे. प्रसिद्धीचा हव्यास नसणारे नेते क्वचितच सापडतात, त्यापैकीच एक म्हणजे अमित सामंत होय. सामाजिक कार्यात ते नेहमीच अग्रेसर असतात. विनाकारण आक्रमक होऊन तोंडाची वाफ घालविण्यापेक्षा स्वतःच्या कामातून, कार्यातून लोकांच्या हृदयापर्यंत पोहचण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राष्ट्रवादीमध्ये दिग्गज नेते असतानाही पक्षाची महत्वाची जबाबदारी मोठ्या विश्वासाने शरद पवार यांनी अमित सामंत यांच्यावर सोपवली आहे. पवारांचे जवळचे असूनही कधी त्यांनी कधी बडेजाव दाखवला नाही. त्यांच्या कार्यकुशल नेतृत्व गुणामुळे, संघटन कौशल्यामुळेच त्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्याची विस्कटलेली घडी पुन्हा बसविण्याची जबाबदारी देत जिल्हाध्यक्ष पदाची माळ त्यांच्या गळ्यात घालण्यात आली आणि त्याही कसोटीवर अमित सामंत खरे उतरले आहेत, अशा या राष्ट्रवादीच्या डॅशिंग नेत्याचा आज वाढदिवस. त्यांच्या वाढदिवसाबद्दल ग्लोबल महाराष्ट्र न्युज चॅनेलच्यावतीने त्यांना हार्दीक शुभेच्छा व त्यांच्या राजकीय व सामाजिक कार्याला साष्टांग प्रणाम…..

You cannot copy content of this page