राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांचा पुढाकार
*💫कणकवली दि.२१-:* राष्ट्रवादी सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गरजू शेतकऱ्यांना राष्ट्रवादीच्या माध्यमातून शेती विषयक साहित्य राष्ट्रवादीचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या नेतृत्वाखाली वाटप करण्यात आले. राष्ट्रवादी कणकवली तालुकाध्यक्ष राजू पावसकर, युवक तालुकाध्यक्ष सागर वारंग कणकवली शहराध्यक्ष संदेश मयेकर ,कणकवली विधानसभा मतदार संघाचे युवक अध्यक्ष देवेंद्र पिळकर, उत्तम तेली, संतोष तेली, अशोक पवार, स्नेहा सावंत, मारुती पवार, संतोष चव्हाण, संतोष सावंत अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. अमित सामंत यांना वाढदिवसाच्यानिमित्ताने यावेळी शुभेच्छा व्यस्त करण्यात आल्या.
