सावंतवाडी येथे जागतिक योग दिन साजरा

*भाजप सावंतवाडी महिला मंडळातर्फे शहराध्यक्षा मोहिनी मडगावकर यांचे आयोजन

*💫सावंतवाडी दि.२१-:* जागतिक योग दिनानिमित्त भाजप सावंतवाडी महिला मंडळातर्फे सावंतवाडी येथे योग दिन साजरा करण्यात आला. भाजप महिला शहराध्यक्षा मोहिनी मडगावकर यांनी योगाची माहिती देत योगासने, प्राणायाम व सूर्यनमस्कार करून घेतले. योगा केल्याने कोविडसारख्या आजारातून आपण वाचू शकतो व निरोगी राहू शकतो हे समजावून दिले. यावेळी भाजप सरचिटणीस मेघना साळगावकर, बेला पिंटो, परिणीती वर्तक, तसेच भाजप पदाधिकारी उपस्थित होते. यात लहान मुलेही सहभागी झाली होती.

You cannot copy content of this page