*शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याचे सरपंच अजित परब यांचे आश्वासन
*💫सावंतवाडी दि.२०-:* उपवडे येथील कै. लक्ष्मण विठ्ठल सावंत कुटुंबाला आर्थिक हातभार लावत शिवसेनेचा वर्धापनदिन साजरा केला. कै.लक्ष्मण विठ्ठल सावंत यांचा नुकताच अचानक मृत्यू झाला होता.कमवती व्यक्तिचे निधन झाल्याने पत्नी व मुलगा यांच्यावर संकट कोसळले.त्यांना धीर देण्यासाठी उपवडे साकीडे॑ शिवसेना पुढे आली आणि शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापनदिनानिमित्त सावंत कुटुंबाला घरी जाऊन धीर दिला व आर्थिक मदत दिलीव शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळऊन देण्याचे आश्वासन सरपंच अजित परब यांनी दिले.यावेळी ग्रामपंचायत सदस्य निवास कारुडकर, संतोष राऊळ, महादेव राऊळ,दिपक नाईक,अनंत भरडे,बापू सावंत, विशाल शेडगे, मधुकर दळवी,वसंत राऊळ,अक्षय राऊळ आदि शिवसैनिक उपस्थित होते.
