Headlines

समीर नलावडेंच्या आव्हानाला उत्तर देण्यासाठी कणकवलीतील शिवसैनिक पुरेसे!

‘ते’ आव्हान स्विकारण्याची निलेश-नितेश दोन्ही भावांमध्ये हिंमत नाही: सुशांत नाईक

*💫कणकवली दि.२०-:* वैभव नाईक हे कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे लोकनिर्वाचित आमदार असताना कणकवली पुरते मर्यादित असलेल्यानी आमदार वैभव नाईक यांना आव्हान देऊ नये. मुळात समीर नलावडे आणि गोट्या सावंत या दोघांचीही कणकवली बाहेर काय पत आहे…? आव्हान देताना आणि स्वीकारताना आपल्याला समोरच्या माणसाची समाजातील आणि राजकारणातील नेमकी काय पत आहे?याचा विचार करावा. नलावडेंच्या आव्हानाला उत्तर देण्यासाठी कणकवलीतील शिवसैनिक पुरेसे आहेत असा टोला नगरसेवक सुशांत नाईक यांनी लगावला आहे. आम. वैभव नाईक यांनी निलेश राणे व नितेश राणे या दोघा भावांना हिंमत असेल तर खुल्या मैदानात उतरून दाखवण्याचे आव्हान दिले होते. मात्र हे आव्हान स्वीकारण्याची निलेश-नितेश या दोन्ही भावांमध्ये हिंमत नसल्याचे एव्हाना सिद्ध झालेले आहे. मुळात आम. वैभव नाईक यांचा आरोपच हा आहे की निलेश-नितेश हे दोन्ही भाऊ प्रत्यक्ष लढाईच्या वेळी स्वतः पळ काढतात आणि कार्यकर्त्यांना पुढे करतात. स्वभावतः भित्रे असल्यामुळे मैदानात येण्याची या दोघाही भावांना हिंमत होत नाही. निलेश-नितेश राणेंनी पुन्हा एकदा समीर नलावडेंना पुढे करून प्रतिआव्हान दिल्यामुळे आमदार वैभव नाईक यांनी केलेल्या दाव्याला पुष्टी मिळाली आहे. असा प्रति टोला नगरसेवक सुशांत नाईक यांनी लगावला. सुशांत नाईक पुढे म्हणाले, कुणाच्या आव्हानाकडे दुर्लक्ष करायचे याचे काही अलिखित नियम निसर्गानेच आखुन दिलेले असतात. राजकारणात सुद्धा एखादा आमदार दुसऱ्या आमदाराला किंवा एखादा मंत्री दुसऱ्या मंत्र्याला आव्हान देऊ शकतो. आमदारांना किंवा मंत्र्यांना आव्हान देण्यासाठी मुळात राजकारणात तितकी उंची गाठावी लागते. नगराध्यक्ष किंवा माजी जिल्हा परिषद अध्यक्षांचे ते काम नव्हे. आमदारांशी स्पर्धा करण्याच्या प्रयत्नात कधी नगराध्यक्ष पदाचा फुगा फुटेल हे त्यांचे त्यांनाही कळणार नाही. तसेच दहा वर्षापुर्वी वेंगुर्ला शहरात झालेल्या राड्यात भीतीने नितेश राणे जेव्हा शटर ओढुन कार्यालयात लपुन बसले होते, तेव्हा त्यांची सुटका करण्यासाठी गेलेल्या जिल्हाभरातील कार्यकर्त्यांमध्ये नारायण राणेंसोबत समीर नलावडे आणि गोट्या सावंत ही जोडी सुद्धा उपस्थित होती. एक महिन्याची शिक्षा भोगून झाल्यानंतर आता जामिनावर हे दोघेही बाहेर फिरत आहेत. हाणामारीच्या प्रकरणात दोषी ठरलेल्या समीर नलावडे व गोट्या सावंत यांनी राजकीय दहशतवादावर भाष्य करावे, यासारखा दुसरा कोणताही विनोद असु शकत नाही. तीन-चार दिवसापुर्वी झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये अनौपचारिक गप्पा मारताना नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी आमदार वैभव नाईक आम्हाला चालतील अशा शब्दात स्तुतीसुमने उधळली होती. जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारी या घटनेचे साक्षीदार आहेत. आज तेच समीर नलावडे आपल्या नेत्यांना खुष करण्यासाठी आमदार वैभव नाईकांना आव्हान देत आहेत. मुळात भाजप व शिवसेना अशा दोन्ही दगडांवर पाय ठेवु पाहणाऱ्या समीर नलावडेंनी कुणाला आव्हान देण्याच्या भानगडीत पडुच नये. त्यांचा इतिहास पळ काढण्याचा आहे. वरवडेत सोनू सावंत यांच्या कार्यकर्त्यांना घाबरून त्यांनी पळ काढला होता. नलावडेंच्या आव्हानाला उत्तर देण्यासाठी कणकवलीतील शिवसैनिक पुरेसे आहेत. अशी टिका नगरसेवक सुशांत नाईक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

You cannot copy content of this page