अल्पवयीन युवतीवर बळजबरी करणाऱ्या युवकाला अटक

पोस्को अंतर्गत युवकावर दाखल करण्यात आला गुन्हा

*💫देवगड दि.२०-:* देवगड तालुक्यातील एका गावामध्ये १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेवून बळजबरी केल्याप्रकरणी गावातीलच एका युवकावर देवगड पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली आहे. हा प्रकार १७ जुन रोजी दुपारी २.३० वा घडला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, देवगड तालुक्यातील एका गावातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला त्या गावातील एका युवकाने फुस लावून पळवून नेले व त्यानंतर तिच्यावर लैगिक अत्याचार केले. याबाबत पीडीत मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून देवगड पोलिसांनी संशयित युवकाविरूध्द पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली. तपास महिला पो.उपनिरिक्षक शीतल पाटील करीत आहेत.

You cannot copy content of this page