*💫मालवण दि.२०-:* नैसर्गिक साधनसंपत्ती, पर्यावरणाचा पूरक वापर करून सिंधुदुर्ग जिल्ह्यात नैसर्गिक व मेडिकल टुरिझमबाबतच्या माहितीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघातर्फे स्थानिक पर्यटन व नवोदित व्यावसायिक तसेच युवक युवतीसाठी बुधवार दि. २३ जून रोजी सकाळी ११.३० वाजता बेबीनार आयोजित केला आहे. यामध्ये डॉ.रविंद्र मराठे हे मार्गदर्शन करणार आहेत. डॉ. रविंद्र मराठे हे एम.डी.असून कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटल आणि नानावटी हॉस्पिटल मध्ये संलग्न असून नेचरक्यूअर इन्स्टिट्यूट नाशिकशी २००७ पासून संलग्न असून या संस्थेमार्फत चालू असलेल्या निसर्गउपचार शिक्षण अभ्यासक्रमाविषयी तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात मेडिकल टुरिझम विषयी संधी याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा खऱ्या अर्थाने पर्यटन जिल्हा व्हावा यांसाठी सिंधुदुर्ग पर्यटन व्यावसायिक महासंघाचा हा एक उपक्रम असून सर्वांनी यां वेबीनार मध्ये https://m.facebook.com/sindhuparyatan या पेजवर सहभाग घ्यावा, असे आवाहन महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी केले आहे.
मेडिकल टुरिझम अभ्यासक्रम क्षेत्रातील संधी विषयी वेबिनार
