30 व्या स्मृतिदिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन
*💫कणकवली दि.२०-:* कै. श्रीधर नाईक यांच्या 30 व्या स्मृतिदिनानिमित्त मंगळवार 22 जून रोजी सकाळी १०.३० वाजता श्रीधर नाईक यांच्या नूतन पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे. तसेच १०.४५ रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून यावेळी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन श्रीधर नाईक प्रेमींच्यावतीने करण्यात आले आहे. कै. श्रीधर नाईक यांच्या 30 व्या स्मृतिदिनानिमित्त होणाऱ्या या पुतळा अनावरण व रक्तदान शिबिर कार्यक्रमाला पालक मंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, माजी पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, ब्रिगेडियर सुधीर सावंत, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळा गावडे, साईनाथ चव्हाण, , शिवसेना नेते सतीश सावंत,गौरीशंकर खोत, अतुल रावराणे, संदेश पारकर, राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष बाळा भिसे, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विकास सावंत व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इतर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले नाही. तसेच पुतळा अनावरण व रक्तदान शिबिरही covid-19 चे नियम पाळून करण्यात येणार आहे. दरम्यान या कार्यक्रमांना जिल्ह्यातील सर्व श्रीधर नाईक प्रेमींनी उपस्थित राहावे असे आवाहन श्रीधर नाईक प्रेमींच्या वतीने करण्यात आले आहे.
