शासकीय ठेकेदार महेंद्र रावराणे यांचे निधन

*💫कणकवली दि.२०-:* लोरे नं. 1 गावठणवाडीतील व सध्या कलमठ-बिडयेवाडी येथे राहत असलेले शासकीय ठेकेदार महेंद्र वसंतराव रावराणे (51) यांचे मुंबई येथील रूग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. शासकीय ठेकेदारीबरोबरच सामाजिक कार्यात सक्रीय असणारे व अनेक गरजुंना मदतीचा हात देणार्‍या महेंद्र रावराणे यांच्या निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे. महेंद्र रावराणे यांना 7 जून रोजी उपचारासाठी कोल्हापूर येथील खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथून अधिक उपचारासाठी 12 जून रोजी मुंबईला हलविण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्रकृती अधिकच गंभीर होत त्यांचा मृत्यू झाला. महेंद्र रावराणे हे गेली अनेक वर्षे शासकीय ठेकेदारीचा व्यवसाय करत होते. त्यांचा लोकसंपर्क दांडगा होता तर मित्र परिवारही मोठा होता. पश्चात पत्नी, मुलगा, भाऊ, बहिण असा परिवार आहे.

You cannot copy content of this page